Skip to content Skip to footer

कोरोनाच्या धास्तीने मुंबईत जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांची झुंबड…

कोरोनाच्या धास्तीने मुंबईत जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांची झुंबड…

सध्या राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे. त्यातच राज्य आणि केंद्र सरकारतर्फे अनेक उपाययोजना नागरिकांना सांगण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा रेल्वे – बससेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार बंद ठेवण्याची घोषणा शुक्रवारी केली. त्यामुळे मुंबई ठप्प होण्याच्या भीतीने नागरिकांची तारांबळ उडालेली दिसून येत आहे. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दुकानांमध्ये रांगा लावल्या. तर दुसरीकडे कामावर आलेल्या नोकरदारांनी घरी जाण्यासाठी महत्त्वाच्या स्थानकांत गर्दी केली होती.

तसेच उद्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर संपूर्ण देशात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला आहे. सकाळी ७:०० ते रात्री ९:०० पर्यंत कर्फ्यु राहणार आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिलेली आहे. तसेच या वेळेत कोणीही घराबाहेर न पडण्याचे आव्हान पंतप्रधानांनी देशातील जनतेला केलेले आहे. त्यामुळे आजच रविवारची खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडणार आहे. अशीच परिस्थिती निर्माण होताना दिसून येईल.

Leave a comment

0.0/5