Skip to content Skip to footer

कोरोनाच्या संकटात काळे झेंडे घेऊन आंदोलन करण्याची कल्पना कशी येऊ शकते? – अजित पवार

कोरोनाच्या संकटात काळे झेंडे घेऊन आंदोलन करण्याची कल्पना कशी येऊ शकते? – अजित पवार

माजी मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले ‘काळे झेंडे आंदोलन’ हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

“कोरोनाविरुद्धची लढाई संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत असून सर्व आव्हानांवर मात करुन ही लढाई आपण नक्की जिंकूच,” असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. मुंबईसह महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या गेल्या आहेत. आरोग्य सेवा सक्षम करण्यात आली आहे, असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5