Skip to content Skip to footer

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा मला पाठिंबा ! – सोनू सूद.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा मला पाठिंबा ! – सोनू सूद.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बोचऱ्या टिकेनंतर सोनू सूद याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर सोनूने एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बरोबर झालेल्या भेटीचा सारा तपशील जाहीर केला.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खूप सपोर्टिव्ह आहेत. “काहीही मदत लागली तर नक्की सांगा… आम्ही लागेल ती मदत करू”, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सोनू याने सांगितले. त्यांनी आताही मजुरांना घरी पाठवण्यासाठी मदत केली आहे. त्यांचं खूप सहकार्य लाभलं आहे. म्हणून मी त्यांचे आभार मानू इच्छितो, असंही सोनू म्हणाला.

Leave a comment

0.0/5