Skip to content Skip to footer

कलाकार असल्यामुळेच मुख्यमंत्री झालो !

कलाकार असल्यामुळेच मुख्यमंत्री झालो !

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील संघर्ष अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. सत्ता स्थापनेपासून ते अगदी विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांच्या वादापर्यंत हा वाद दिसून आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची जुगलबंदी पाहायला मिळाली आहे.

मुंबईतील के. सी. महाविद्यालय, एच. आर. वाणिज्य महाविद्यालय व बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश असलेल्या हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह विद्यापीठाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेही उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना टोला लगावला आहे. ‘आपण मुख्यमंत्री झालो नसतो, तर नक्कीच एक कलाकार झालो असतो, किंबहुना आपण कलाकार असल्यामुळेच मुख्यमंत्री आहोत”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Leave a comment

0.0/5