Skip to content Skip to footer

पंतप्रधान गप्प का?, कुठे लपला आहात?, घाबरू नका, आम्ही सोबत आहोत ! बघा कोणी केली ही टीका…

पंतप्रधान गप्प का?, कुठे लपला आहात?, घाबरू नका, आम्ही सोबत आहोत ! बघा कोणी केली ही टीका…

लडाखमध्ये चीनी सैनिकांविरुद्ध झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्याने संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण पसरले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेत सुमारे ४३ चिनी सैनिकही ठार झाले आहेत. चिनी सैनिकांच्या या भयानक कृत्याचा देशभर विरोध होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका ट्विटद्वारे देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘देशातील शूर शहीदांना माझा सलाम’, असे म्हटले आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटसह एक व्हिडिओही शेअऱ केला आहे. दोन दिवसांपूर्वी भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. कुटुंब छिनले. चीनने आमची जमीन हडप केली. पंतप्रधान तुम्ही गप्प का आहात? कुठे लपत आहात? बाहेर या. संपूर्ण देश, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे आहोत. बाहेर या आणि देशाला सत्य सांगा, घाबरू नका”, असे राहुल गांधी यांनी या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे.

Leave a comment

0.0/5