Skip to content Skip to footer

लोकसभेत महाराष्ट्राचा डंका ! – सर्वाधिक चर्चांमध्ये सहभागी होते शिवसेनेचे खासदार !

लोकसभेत महाराष्ट्राचा डंका ! – सर्वाधिक चर्चांमध्ये सहभागी होते शिवसेनेचे खासदार !

लोकसभेतील सार्वधिक चर्चांमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र व देशहिताच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यात महाराष्ट्रातील खासदारांना यश आले आहे. आज परिवर्तनने बनवलेले १७ व्या लोकसभेतील ५४३ मतदारसंघातील खासदारांचे रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध झाले आहे. सजग मतदार (informed electorate) ही प्रगल्भ लोकशाहीसाठी पूर्वअट आहे. केवळ निवडणुकीच्या वेळेस नव्हे तर, दोन निवडणुकीच्या दरम्यानच्या काळातही आपल्या प्रतिनिधीने केलेल्या कामांचा आढावा या रिपोर्ट मध्ये दिला जातो.

प्रत्येक खासदाराने निवडून आल्यापासून काय काय काम केले, त्यांची उपस्थिती किती होती, त्यांनी किती चर्चांमध्ये सहभाग घेतला इत्यादी निकषांच्या आधारे हा रिपोर्ट काढला जातो. लोकसभेतील खासदारांच्या कामांचा आढावा व त्याचा अहवाल बनवतांना ग्राह्य धरले जाणारे निकष : १) खासदारांची लोकसभेतील एकूण उपस्थिती.
२) खासदारांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या.
३) लोकसभेतविविध विषयांवर, प्रस्तावित कायद्यांवर, अहवालांवर होणाऱ्या चर्चांमध्ये खासदारांच्या सहभागाची एकूण संख्या.
४) खासदारांनी लोकसभेत स्वतंत्रपणे मांडलेल्या विधेयकांची संख्या.
५) MP Local Area Development Scheme (MPLADS) या योजनेनुसार खासदारांनी वापरलेला निधी.

या सर्व निकषांमध्ये यावेळी महाराष्ट्रातील खासदारांनी विशेष कामगिरी केली आहे. लोकसभेत महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहत अधिकाधिक चर्चांमध्ये सहभागी होण्याचा बहुमान शिवसेना खासदारांना मिळाला आहे. त्यामध्ये मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचे राहुल शेवाळे, कल्याण मतदारसंघाचे डॉ. श्रीकांत शिंदे, मावळ मतदारसंघाचे श्रीरंग बारणे व रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विनायक राऊत यांचा पहिल्या पाचमध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सार्वधिक चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या पाच मधले सर्व खासदार महाराष्ट्राचे आहेत.

Leave a comment

0.0/5