Skip to content Skip to footer

रोहित पवारांचा पुन्हा भाजपा नेत्यांना टोला वाचा काय म्हणाले..!

रोहित पवारांचा पुन्हा भाजपा नेत्यांना टोला वाचा काय म्हणाले..!

कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपावर तोफ डागली आहे. महाविकास आघाडी मध्ये प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला जातो. भाजपा सरकारच्या काळात एका व्यक्तीची फक्त मत्तेदारी होती. भाजपाच्या नेत्यांना खाजगीत विचारा तेही तुम्हाला हेच सांगतील, असा सणसणीत टोला रोहित पवार यांनी भाजपाला लावला आहे.

कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नगरमध्ये आलेल्या रोहित पवार यांना पत्रकारांनी आघाडीत असलेल्या मतभेदाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर रोहित पवारांनी आपले मत मांडले होते. ‘भाजपकडे सरकारवर टीका करण्यास मुद्दे नाहीत. त्यामुळे समन्वयाबद्दल बोलले जातं आहे. पण त्याला काही अर्थ नाही. भाजपचे राज्यातील नेते राजकीय पतंग उडवून जनतेची दिशाभूल करत आहेत. आघाडी सरकारमध्ये कुठलाही मतभेद नाही’, असे पवार यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5