Skip to content Skip to footer

ड्रग घेतल्याची कबुली देणाऱ्या, कंगना रानौतवर कारवाही करण्याची हिंमत एनसीबी कधी दाखवणार ?- सचिन सावंत

निर्माता कारण जोहर याच्या घरी झालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटी पार्टीवरून एनसीबीने करण जोहरला समन्स बजावला आहे. हा विडिओ २०१९ चा असून त्यावेळी असलेल्या फडणवीस सरकारने किंवा एनसीबीने कारवाही का केली नाही. पार्टीच्या व्हिडिओवरून करणला चौकशीस बोलणारी एनसीबी कंगणा राणावतला चौकशीसाठी बोलवण्यास का घाबरते? ड्रग संदर्भात तिचाही एक व्हिडिओ वायरल झालेला आहे. तिच्याबदद्ल एनसीबीला एवढी आपुलकी का व कशासाठी ? असे अनेक प्रश्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारले आहे.

यावर बोलताना सावंत म्हणाले की, राष्ट्रीय तपास यंत्रणा ह्या भारतीय जनता पार्टी सरकारच्या हातच्या बाहुल्या झाल्या आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर त्या नाचत आहेत हे वारंवार स्पष्ट होत आहे. एनसीबी, ईडी, सीबीआय, आयकर विभाग या राष्ट्रीय तपास यंत्रणा सिलेक्टिव्ह चौकशी करताना दिसत आहेत. एका पार्टीच्या व्हिडिओवरून करण जोहरची चौकशी होऊ शकते तर मग कंगणाच्या चौकशीची हिंमत एनसीबी का दाखवत नाही. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात एनसीबीचा काय स्वार्थ असावा. करण जोहरच्या पार्टीचा व्हिडिओ २०१९ चा आहे त्यावेळी गृहमंत्री फडणवीस होते त्यांनी यावर खुलासा करावा असे आवाहन सावंत यांनी दिले आहे.

Leave a comment

0.0/5