Skip to content Skip to footer

“नया है पर छाया है वह… ” – विशेष लेख !

“नया है पर छाया है वह… ” – विशेष लेख !

कोरोनाच्या संकटात विरोधी पक्षाने सुरु ठेवलेल्या राजकीय नाट्याचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांच्या टीकेला उत्तर देताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी “नया है वह” म्हणत स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्याचे चित्र सोशल मीडियावर त्यांच्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवरून दिसून येत आहे.

१७ ऑक्टोबर २०१० रोजी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत युवासेनेची स्थापना झाली. त्यानंतर आजतागायत विद्यार्थ्यांचे प्रश्न युवासेनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे स्वतः पुढाकार घेत आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्हयाचे आमदार आणि भाजपाचे प्रदेश सरचिटणीस होते. त्यामुळे आपल्यापेक्षा आदित्य ठाकरे यांना मोठ्या व लहान स्तरांवरील राजकारणाचा चांगला अभ्यास, अनुभव होता हे प्रकर्षणाने जाणवते.

युवासेनेच्या स्थापनेनंतर आदित्य ठाकरेंनी युवकांसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम हाती घेतले. विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे, महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे, एसएससी आणि एचएससी सारख्या शैक्षणिक बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे, “बेस्ट ऑफ फाइव्ह” सारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहणे, एचएससी परीक्षेच्या कठीण पातळीवर भाष्य करून विद्यार्थ्यांची बाजू मांडण आणि यासारखी अनेक विद्यार्थी हिताची कामे युवासेना विद्यार्थ्यांसाठी करत असते. आज इतके वर्ष विध्यार्थी वर्गासाठी झगडणाऱ्या व्यक्तीला आपण “नया है वह” असं म्हणणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

देशात फुटबॉलचा खेळ रुजवण्यासाठी आदित्य ठाकरे विशेष प्रयत्न केले आहेत. मुंबईत फुटबॉलसाठी आवश्यक अशी मैदाने उपलब्ध करून त्यावर विविध स्तरांवरील प्रतिष्ठित संघांचे सामने आयोजित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. “मुंबई नाईटलाइफ” संकल्पना राबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील जिजामाता उद्यानात “हंबोल्ट पेंग्विन” आणण्याची त्यांची संकल्पना अत्यंत यशस्वी झाली आहे आणि त्यामुळे महापालिकेचा महसूल सुद्धा कित्येक पटींनी वाढला आहे. अशा विकसनशील विचारांचं युवा नेतृत्व ‘नया’ असू असेल, पण आज तेच ‘छाताना’ दिसत आहे.

विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं वहावं लागू नये, यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्नशील आहेत काही प्रमाणात यशस्वी देखील झाले आहेत. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत “टॅब” वाटपाच्या उपक्रमात त्यांचा पुढाकार घेतल्याचे सर्वांनी पाहिले होते. प्रतिवर्षी बारावी विज्ञान शाखेचे लाखो विद्यार्थी “एमएच सीईटी” या महत्वाच्या आणि भविष्याची दिशा ठरवणार्‍या परीक्षेला सामोरे जात असतात. त्यांना सरावासाठी युवासेनेमार्फत “वायएस सीईटी” या मोफत सराव परीक्षेचे आयोजन आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली केले जाते, असे उपक्रम राबविणाऱ्या आदित्य ठाकरे यांना “नया है वह” असे कसे म्हणता येईल ?, असा प्रतिसावालच आता उपस्थित होत आहे.
मुली व महिलांची सुरक्षा हा आजचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. यावर भरीव उपाय म्हणून युवासेनेच्या पुढाकाराने महिला व मुलींना आत्मरक्षणाचे धडे देण्यासाठी मोफत कार्यशाळा आयोजित करून दिले जात आहेत. मुंबईत ठिकठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आदित्य ठाकरे यांचा पुढाकार आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिक हानिकारक आहे व ते नष्टही होत नाही हे आपण जाणतोच. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आदित्य ठाकरेंची प्रमुख भूमिका आहे. हे सुद्धा देवेंद्र फडणवीस विसरल्याचे दिसत आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आदी राज्यातील जनतेचे प्रश्न जाणण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जण ‘आशीर्वाद दौरा’ केला होता. त्यावेळी आपण आदित्य ठाकरे यांच्या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून आपण सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या यात्रेची कॉपी करत महाजानदेश यात्रा काढली होती, हे आज आपण विसरला आहेत, अशा कॉमेंट्स पण बघायला मिळत आहेत. म्हणून आज तुमच्यापेक्षा आदित्य ठाकरे यांचे वय कमी असले तरी राजकारणात ते तुमचे गुरु आहेत, असे म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही, अशाप्रकारचे प्रखर टीका फडणवीसांवर केल्या जात आहेत.

1 Comment

  • Вам перевод 156866 р. https://tinyurl.com/Alacleks NMVV10040954RKKF
    Posted September 15, 2020 at 11:07 pm

    Вам перевод 182662 р. https://tinyurl.com/Alacleks NMVV10040954RKKF

Leave a comment

0.0/5