Skip to content Skip to footer

भाजपा नेत्यांमध्ये असलेले दुमत चव्हाट्यावर ; सोशल मीडियावर चर्चा..

भाजपा नेत्यांमध्ये असलेले दुमत चव्हाट्यावर ; सोशल मीडियावर चर्चा.. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्ली राज्याच्या राजकारणात मोठे विधान केले आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत, असे विधान पाटील यांनी केले होते. मात्र त्यांच्या या विधानाला आता खुद्द विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे.

कोणत्याही परिस्थितीत आम्ही शिवसेना सोबत जाणार नाही, असे वक्तव्य फडणवीस यांनी केलेले आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांनी केलेले विधान खोडून काढले. मात्र फडणवीसांनी पाटील यांच्या विधानाला दर्शवलेल्या विरोधामुळे पाटील आणि फडणवीस यांच्या दुमत आहे हे आता सिद्ध होत आहे.

पाटील यांनी शिवसेना सोबत जाण्याच्या वक्तव्यावर बोलताना केंद्रातील वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील ते आम्हाला पाळावे लागतात असे फडणवीसांनी बोलून दाखविले होते. म्हणजेच पुन्हा सेनेबरोबर युती करण्यासाठी दिल्लीतील भाजपा नेते सकारत्मक असल्याचे चित्र पाटील यांच्या बोलण्यातून दिसून आले आहे. मात्र या पाटलांच्या या निर्णयाला फडणवीसांचा का विरोध केला असेल असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Leave a comment

0.0/5