भाजपामध्ये गेलेल्या आमदारांची घरवापसी होणार ! – नवाब मलिक

भाजपामध्ये गेलेल्या आमदा-Amda who went to BJP

भाजपामध्ये गेलेल्या आमदारांची घरवापसी होणार ! – नवाब मलिक

राष्ट्रवादीचे १२ आमदार फुटणार असल्याच्या जोरदार चर्चा राज्याच्या राजकार ,णात होताना दिसून येत होत्या. यावर आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही, असं सांगतानाच उलट राष्ट्रवादीमध्येच काही आमदार प्रवेश करण्यासाठी अतूर आहेत, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे नवाब मलिकांच्या या दाव्यामुळे भाजपा आमदारांमध्ये पक्षांतरांचे वारे वाहू लागले आहे, असे सांगितले जात आहे.

याबाबत माहिती देताना नवाब मलिक यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. “काही लोक राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची अफवा पसरवत आहेत. या वृत्तात काहीही तथ्य नसून खोटे वृत्त पसरविले जात आहे. उलट निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले आमदार आता राष्ट्रवादीत यायला अतूर आहेत. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. लवकरच त्याबाबतची माहिती सर्वांना दिली जाणार आहे”, असं मलिक यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here