मराठा आरक्षण टिकावे म्हणून सर्व खासदारांनी एकत्र यावे – छत्रपती संभाजीराजे
उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले होते. त्यातच अनेक ठिकाणी आंदोलने सुद्धा सुरु झाली होती. त्यातच आता मराठा समजला आरक्षण माळवे म्हणून सर्व पक्षभेद विसरून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येण्याचे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजेंनी केले होते.
राजेंनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून आज पर्यंत अनेक खासदारांनी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र राजेंना दिले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी निवेदन देणार आहोत.
पुढे बोलताना राजे म्हणाले की, सक्रिय पाठिंबा दिलेल्या सर्व खासदारांचे समाजाच्या वतीने, ‘समाजाचा घटक’ या नात्याने मी आभार व्यक्त करतो. आता बऱ्याच खासदारांनी संसदेत आवाज उठवायला सुरुवात केली आहे, त्यांचेही समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणखी ही खासदार येऊन भेटणार आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत राज्यात आणि केंद्रात सर्वांना सोबत घेऊन माझे प्रयत्न सुरूच राहतील. असे सुद्धा त्यांनी बोलू दाखविले होते.
आजपर्यंत ज्या खासदारांनी पाठिंबा दिला त्यांची नावे पुढील प्रमाणे –
खा. श्रीरंग आप्पा बारणे ( मावळ )
खा. हेमंत आप्पा गोडसे ( नाशिक )
खा. डॉ. श्रीकांत शिंदे ( कल्याण )
खा. धैर्यशील माने ( हातकणंगले )
खा. नवनीतकौर ताई राणा ( अमरावती )
खा. राहूल शेवाळे ( दादर )
खा. प्रतापराव जाधव ( बुलढाणा )
खा. ओमराजे निंबाळकर ( धाराशिव )
खा. डॉ. भारतीताई पवार ( दिंडोरी )
खा. हिनाताई गावित ( नंदुरबार )
खा. रक्षाताई खडसे ( रावेर )
खा. डॉ. प्रितमताई मुंडे ( बीड )
खा. डॉ. सुजय विखे पाटील ( नगर )
खा. उन्मेष पाटील ( जळगाव )
आ.रवी राणा
माजी. आ. निर्मला गावित(इगतपूरी)