Skip to content Skip to footer

आरोप सिद्ध करा हवी ती शिक्षा भोगेल ! – किशोरी पेडणेकर

आरोप सिद्ध करा हवी ती शिक्षा भोगेल ! – किशोरी पेडणेकर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एआरए प्रकल्पातील सदनिका लाटल्याचा आरोप भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच काल त्यांनी पेडणेकर यांच्या राजीनाम्या संदर्भात त्यांनी मनपाच्या गेटजवळ आंदोलन सुद्धा केले होते. यावर आता महापौर पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे.

पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांना आरोप सिद्ध करण्याचे आवाहन केले आहे. ‘तुम्ही आरोप सिध्द करा, मी शिक्षा भोगायला तयार आहे’, असे खुले आवाहन महापौरांनी किरीट सोमय्या यांना दिले आहे. यावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या आहेत की, बेताल वक्तव्यामुळे किरीट सोमय्या यांची खासदारकी गेलीय. मुळात त्यांच्याप्रमाणे आम्ही काहीही लाटलेलं नाही. माझं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान आहे.

मी २००८ मध्ये तिथे भाड्याने राहत होते. दरवर्षी ते भाडं मालकाला जाते, त्याचे सगळे पुरावे आहेत. किश कॉर्पोरेटचे ऑफिसही भाडेतत्त्वावरच घेतलेले आहे. त्यामुळे लाटण्याचा प्रश्नच कुठे येतो? आमच्याकडे सगळे पेपर आहेत.

माझे घर, वकील चाळ जी अजूनही डेव्हलप होतेय, कदाचित मे महिन्यात त्याचा ताबा मिळेल. तोपर्यंत आम्ही भाड्याने राहतोय आणि दरवर्षी पाच टक्क्यांनी मालकाला वाढवून भाडं देतोय. मी सामान घेऊन कुठे फिरु. तुम्ही आरोप सिद्ध करा. सिद्ध झाले तर मी शिक्षा भोगेन. किरीट सोमय्या माझ्यावर खोटे आरोप करत आहेत, असे किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट केले आहे.

Leave a comment

0.0/5