‘त्यांनी ईडी लावली तर आपण सीडी लावू!’
भारतीय जनता पक्षाचे माजी वरिष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, मला कार्यकर्ते म्हणायचे की, भाऊ ते सत्तेत आहेत जर आपण आताच पक्षप्रवेश केला तर ते ‘इडी’ मागे लावतील. त्यावेळी मी बिनदास्त सांगायचो की ‘त्यांनी इडी लावली तर आपण सीडी लावू’ त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, असे दमदार उत्तर देऊन खडसे यांनी सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणले.
पुढे बोलताना खडसे म्हणाले की, मी साहेबाचा खूप आभारी आहे. आता त्यांना माझी ताकद कळेल. सध्या कोरोना आहे म्हणून….एकदा या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला की, पुन्हा एकदा जळगावात मोठा कार्यक्रम घेऊ, असे खडसे यांनी बोलून दाखविले होते. यावेळी नाव न घेता खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता.