आमदार गीता जैन यांच्या समर्थानात लवकरच २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार ?

आमदार-गीता-जैन-यांच्या-सम-MLA-Gita-Jain's

आमदार गीता जैन यांच्या समर्थानात लवकरच २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार ?

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने मिळून महाविकास स्थापन करून सरकार स्थापनक केले होते. या घडलेल्या घडा-मोडीनंतर विरोधी पक्षातील अनेकांनी सोडचिट्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला होता.

काही दिवसांपूर्वी राज्यचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्र्वादीत प्रवेश केला होता. तर मिरभाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. आता त्या पाठोपाठ जैन समर्थानात २० नगरसेवक शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

आमदार गीता जैन यांच्या शिवसेना प्रवेशाने येणाऱ्या मीराभाईदर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आपली सत्ता सुध्दा गमवावी लागु शकते असे अंदाज बांधला जात आहे यांचे कारण म्हणजे विधानसभेच्या वेळी भाजपातुन बंडखोरी करुन त्यानी भाजपाचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here