Skip to content Skip to footer

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघालेच होते – शशिकांत शिंदे

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघालेच होते – शशिकांत शिंदे

दोनच दिवसांपूर्वी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी “जलमंदिर” येथे पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारवर मराठा आरक्षणावरून जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोलाही लगावला होता.

आता उदयनराजे यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघालेच होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रश्न मार्गी का लावले नाहीत, असा सवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या. मराठा समाजाला आरक्षण देण्याची हमी मी देतो, असे वक्तव्य भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी अलिकडेच केले आहे. या मुद्द्यावरून देखील आमदार शिशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

फडणवीस सरकार कार्यकाळात मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेले वकीलच आताही हा खटला सर्वोच्च न्यायालयात लढवत आहेत. पण तरीही याप्रश्नी जाणीवपूर्वक राजकारण करण्यात येते. मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असून, भाजप देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

Leave a comment

0.0/5