Skip to content Skip to footer

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले हे आमचे सर्वात मोठे यश! – बाळासाहेब थोरात

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले हे आमचे सर्वात मोठे यश! – बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र टाइम्स या वृत्तसमुहाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली होती. देशात आणि राज्यात कायम दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करीत देशविरोधी कृत्ये करणाऱ्या भाजपला आम्ही तीनही पक्षांनी एकत्रित येऊन सत्तेपासून दूर ठेवले हेच आमचे सर्वांत मोठे यश असल्याचे आम्ही मानतो, असं मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

ठाकरे सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त महाराष्ट्र टाइम्सने घेतलेल्या मुलाखतीत मंत्री थोरात यांनी मुक्त संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज्यातील विरोधी पक्षाचा खरपूस समाचारही घेतला होता. विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये नैराश्याची भावना आलेली दिसते. त्यांच्या हातात सत्ता नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये फूट पडू नये यासाठी त्यांना कायम आपली सत्ता येणारच आहे, असे गाजर कार्यकर्त्यांना दाखवावे लागते, असे थोरात म्हणाले.

पुढे बोलताना थोरात म्हणाले की, ‘सध्या काँग्रेसचा कठीण काळ असला तरी शाश्वत तत्त्वांशी कोणतीही तडजोड न करता वाटचाल करणाऱ्या काँग्रेसची इतिहासात नोंद होईल’, असेही ते म्हणाले. कोरोना काळात राज्यातील एकूणच कामाची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली याकडे लक्ष वेधत, याच काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे कामही केल्याचे थोरात यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5