Skip to content Skip to footer

महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी पूढील वाटचालीस शुभेच्छा

महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी पूढील वाटचालीस शुभेच्छा

विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश आज केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अनिल सरदेसाई यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. उर्मिला यांचा भगवा मास्क यावेळी लक्षवेधी ठरला.

त्यातच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उर्मिला मार्तोडकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘पक्षप्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर जी यांची भेट घेऊन त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत केले. तसेच महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5