Skip to content Skip to footer

आमचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा निराळं आहे. प्रत्येकाचा आदर करा, सन्मान करा – आदित्य ठाकरे

आमचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा निराळं आहे. प्रत्येकाचा आदर करा, सन्मान करा – आदित्य ठाकरे

राज्यात महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र मागच्या वर्षभरात भारतीय जनता पक्षाने आघाडी सरकारवर विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. यात भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून वेळोवेळी शिवसेनेला अडचणीत आणायचे काम केले आहे. यावर वर्षपूर्तीनिमित्त नवभारत टाइम्स यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विरोधकांच्या टीकेसंदर्भात विचारण्यात आले.

यावर भाष्य करताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा निराळं आहे. प्रत्येकाचा आदर करा, सन्मान करा. कर्म हीच आस्था आहे. हेच माझं हिंदुत्व आहे,” असं म्हणत हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका करणाऱ्या भाजपाला मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
भाजपाचं हिंदुत्व राजकीय हिंदुत्व आहे. ते माय वे या हाय वे याचा अवलंब करतात. जर ते आपल्या हिंदुत्वाला योग्य मानतात तर पीडीपी सोबत कसे गेले? आम्ही त्यांच्या सोबत होतो. परंतु त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेच का त्यांचं हिंदुत्व? त्यांचं एका राज्यात वेगळं हिंदुत्व दुसऱ्या राज्यात वेगळं हिंदुत्व असतं. आमच्यासाठी हिंदुत्व राजकीय वस्तू नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a comment

0.0/5