Skip to content Skip to footer

शिवसेनेच्या अजाण स्पेर्धेवर भाजपकडून टीका, तर राष्ट्रवादीकडून पाठराखण

शिवसेनेच्या अजाण स्पेर्धेवर भाजपकडून टीका, तर राष्ट्रवादीकडून पाठराखण

मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान पठण स्पर्धाचे आयोजन केले आहे. या संदर्भात पत्रकार माध्यमांशी बोलताना सकपाळ म्हणाले की, ‘मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये प्रचंड गोडवा असून, अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिले आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी अजानची स्पर्धा घेण्याचे माझ्या मनात आले. मात्र या स्पर्धेवर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.’

‘देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही. मात्र भाजपला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही’, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अजान स्पर्धेवर आक्षेप घेणाऱ्या भाजपला आपल्या भाषेत उत्तर दिले आहे. सोलापूर व इतर जिल्हयात घेण्यात आलेल्या गीतापठण कार्यक्रमात मुस्लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला होता. ही सत्य परिस्थिती आहे याची आठवणही नवाब मलिक यांनी यावेळी भाजपला करुन दिली.

‘अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे. त्यामुळे मनःशांती मिळते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे’. ‘अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षीस दिले जाईल. यासाठी मौलाना परीक्षकाचे काम पाहतील’, असे स्पर्धेचे आयोजक पांडुरंग सकपाळ यांच्याडून सांगण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5