Skip to content Skip to footer

पवारांचा नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार आहे – एकनाथ खडसे

पवारांचा नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार आहे – एकनाथ खडसे

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. अनेकांनी मला विचारणा का केली, की तुम्ही राष्ट्रवादी का निवडली? बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम शरद पवार यांनी केलं म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही. पवार इज पॉवर. पवारांनी मुख्यमंत्री असताना मैलाचे दगड व्हावे, असे निर्णय घेतले.

माझे पहिले मुख्यमंत्री म्हणून मी ९० मध्ये त्यांच्यासोबत काम केले. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देण्याचे काम पवारांनी केले. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पवारांनी चांगले निर्णय घेतले. पवारांच्या उत्तम कामगिरीचे अनेक पैलू सांगता येतील, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत गौरवोद्गार काढले. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय बैठकीत बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले, महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार रिक्षा म्हणून भाजपचे नेते टीका करतात. मग, अटलजींनी तर एनडीएचा महाट्रक चालवला होता. त्यांनी अनेकांचे सरकार सांभाळले होते, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले. भाजप मी सोडली नाही तर मला भाजपने बाहेर ढकलले. मागच्या काळात माझा अपमान झाला, डावलले गेले, मला पक्ष सोडायला भाग पाडले, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला.

Leave a comment

0.0/5