Skip to content Skip to footer

नवीन कृषी कायदा रद्द होऊच शकत नाही हे सांगायला चंद्रकांतदादा काय पंतप्रधान लागून गेलेत का – मुश्रीफ

नवीन कृषी कायदा रद्द होऊच शकत नाही हे सांगायला चंद्रकांतदादा काय पंतप्रधान लागून गेलेत का – मुश्रीफ

सध्या देशभरात शेतकरी कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहेत. त्यात उद्या मंगळवारी शेतकरी कायद्याविरोधात विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. तसेच राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने या बंदला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यात काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत कृषी कायदा रद्द होणार नाही असे विधान केले होते, आता त्यांच्या या विधानाचा मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला आहे.

केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात मागच्या १२ दिवसांपासून दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शवत उद्या जाहीर केलेल्या भारत बंद’मध्ये सहभाग घेतला आहे असे मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार माध्यमांशी संवाद साधला होता.
आज कृषी कायद्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणालाच दाद दिली नव्हती. मात्र आज कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे सुरु असलेल्या आंदोलनावर भाष्य करत विचार-विनमय करण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. तसेच कृषी कायदा रद्द होणार नाही असे वक्तव्य करणाऱ्या करणारे चंद्रकांतदादा हे काय पंतप्रधान लागून गेलेत काय ? असा टोला मुश्रीफ यांनी पाटलांना लगावला होता.

Leave a comment

0.0/5