Skip to content Skip to footer

शेतकरी कृषी कायद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपाला टोला

शेतकरी कृषी कायद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपाला टोला

देशात लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे यासाठी मागच्या काही दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. मात्र यावर केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अदयाप तोडगा निघालेला नाही. यावरूनच आता राष्ट्रवादीचे नेते आणि उप-मुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य करत भाजपाला टोला लगावला आहे.

शेतकऱ्यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. जर कृषीविधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे असे केंद्रसरकार बोलत असेल तर शेतकरी या कृषीविधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरला नसता असा टोला पवारांनी भाजपाला लगावला होता.
जनता दरबारसाठी उपमुख्यमत्री अजित पवार हे राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे आलेले असताना प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार आणि राष्ट्रपती यांच्यात झालेल्या भेटीवर सुद्धा भाष्य केले होते.

पवारसाहेब कृषी कायद्यावरून राष्ट्रपतींना भेटले आहेत. त्यावेळी साहेबांनी या विधेयकावर काय केले पाहिजे हे सविस्तर मांडले आहे. केंद्रातील वरीष्ठ मंत्री शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत परंतु तोडगा अजून निघालेला नाही. केंद्र सरकार विधेयकात काही प्रमाणात बदल करणार असल्याचे सांगत आहे मात्र स्पष्ट करत नाही असेही अजित पवार म्हणाले.

Leave a comment

0.0/5