Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री हेल्पलाईन आणि तक्रार निवारण पोर्टल अधिक सक्षम करा – उद्धव ठाकरे

माय गव्ह ॲप, मुख्यमंत्री हेल्पलाईन आणि तक्रार निवारण पोर्टल अधिक सक्षम करून राज्य शासनाच्या सर्व विभागांना याचा सहजपणे उपयोग कसा करता येईल हे पाहावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतला होता. यावेळी त्यांनी महानेटद्वारे ग्रामीण भागातील शिक्षक, विध्यार्थी आणि डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग हा सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना उत्तम सोयी-सुविधा आणि सेवा मिळणे यासाठी व्हावा, त्याकरिता तितकी सक्षम तांत्रिक यंत्रणा असली पाहिजे याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. आवश्यक ते मनुष्यबळ यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

Leave a comment

0.0/5