Skip to content Skip to footer

सेनेसोबत कायम राहायचं आहे, स्थानिक पातळीवर जमवून घ्या, अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे टोचले कान

सेनेसोबत कायम राहायचं आहे, स्थानिक पातळीवर जमवून घ्या, अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे टोचले कान

आपल्याला शिवसेना सोबत कायमच राहायचे आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जमवून घ्या असे आदेश राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची खलबतं झाल्याची माहिती आहे. यावेळी या बैठीकीत पवार यांनी हे उदगार काढले होते.

आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी‌ झाल्यानंतर स्थनिक पातळीवर खटके उडत आहे पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या” अशा स्पष्ट सूचना अजित‌ पवारांनी आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्या.

तसेच लवकरच महामंडळ वाटप करणार असल्याची माहितीही अजितदादांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या

Leave a comment

0.0/5