Skip to content Skip to footer

सौरव दादाची दादागिरी पुन्हा मैदानात दिसणार ?

सौरव दादाची दादागिरी पुन्हा मैदानात दिसणार ?

सौरव गांगुलीची एक आक्रमक कर्णधार आणि फलंदाज अशी त्याची ओळख आहे. गांगुलीच्या खेळाचा आजही क्रिकेट चाहत्यांवर मोठा प्रभाव आहे. गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यापासून त्याच्याकडून पुन्हा एकदा ‘दादागिरी’ची क्रिकेट फॅन्सना अपेक्षा असते. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा २४ डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. या बैठकीत भारतीय क्रिकेटसंबंधी अनेक मोठे निर्णय अपेक्षित आहेत. या निमित्ताने गांगुली पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.

बीसीसीआयच्या बैठकीच्या दरम्यान अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्या टीमममध्ये एक मित्रत्वाचा सामना होणार आहे. अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा मध्ये हा सामना रंगणार आहे. हे स्टेडियम यावर्षीच नव्यानं तयार झाले आहे. या सामन्यासाठी गांगुली मैदानात उतरणार आहे.

Leave a comment

0.0/5