Skip to content Skip to footer

गोस्वामीच्या आर. भारत कार्यक्रमात आलेल्या पाहुण्याने केली अर्नबची बोलती बंद

गोस्वामीच्या आर. भारत कार्यक्रमात आलेल्या पाहुण्याने केली अर्नबची बोलती बंद

काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला इटलीला आपल्या आजींना भेटण्यासाठी निघून गेले. तसेच या विषयावर अर्णब गोस्वामी यांच्या आर. भारत या वृत्तवाहिनीवर चर्चेचा विषय बनवत गोस्वामी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. राहुल यांचा इटली दौरा आणि शेतकरी आंदोलन या दोन्ही गोष्टींची सांगड त्यांनी घातली, पण अर्नबच्या शोमध्ये त्याच्यावर गप्प होण्याची वेळ आली.

अर्णब यांनी विधान केले. त्या विधानावर चर्चेसाठी आलेल्या काँग्रेस प्रवक्त्याने अर्णब यांची बोलती बंद केली. “आपण ३७ मिनिटं चर्चा करतोय पण शेतकरी आत्महत्येबाबत तुम्हीच काहीच का बोलत नाही. उद्योगपतींचे उत्पन्न वाढतं आहे आणि शेतकरी आणखी गरीब होत आहे यावर तुम्ही गप्प आहात. उलटसुलट गोष्टी सांगणे आता बंद करा मिस्टर गोस्वामी.
आज देशातील जनतेला सत्य सांगा. भारत सध्या कठीण काळात आहात. अशा काळात देशवासीयांना एकत्रित आणायला हवे तर तुम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना दिसत आहात”, असे म्हणत काँग्रेस प्रवक्त्याने अर्नबचे तोंड बंद केले.

Leave a comment

0.0/5