Skip to content Skip to footer

भाजपा उपमहापौर राजेश काळे यांना अखेर पोलिसांनी केली अटक

भाजपा उपमहापौर राजेश काळे यांना अखेर पोलिसांनी केली अटक

सोलापूर महानगर पालिकेचे भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप पालिकेच्या एका वरिष्ठ मनपा अधिकाऱ्याने लगावला होता. या प्रकरणी उपमहापौर राजेश काळे यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

भाजपाचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे कट्टर अनुयायी समजले जाणारे उपमहापौर काळे यांनी गेल्या आठवड्यात जुळे सोलापुरात एका सामूहिक विवाह सोहळ्यासाठी महापालिकेचे साहित्य वापरण्यास पालिका परिमंडळ अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. मात्र हे काम बेकायदा असून करता येत नाही म्हणून समजावून सांगितले असता संबंधित अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून खोट्या ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

या प्रकरणी राजेश काळे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र अखेर काळे यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. काळे यांच्या या वर्तणुकीमुळे त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्यात आली होती. क्षातून काळे यांना बडतर्फ करण्याबाबत अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे घेणार असल्याचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Leave a comment

0.0/5