Skip to content Skip to footer

दानवेंनी फेकाफेकी करू नये, मी स्वतः संभाजीनगर संदर्भात फडणवीसांना चार पत्रं पाठवली आहेत – चंद्रकांत खैरे

दानवेंनी फेकाफेकी करू नये, मी स्वतः संभाजीनगर संदर्भात फडणवीसांना चार पत्रं पाठवली आहेत – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र या नामांतरावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले होते. याच मुद्दयांचा फायदा घेत भाजपाने काँग्रेस आणि सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षावर टीका केली होती.

नामांतरावरुन राजकीय वातावरण तापले असतानाच आता या मुद्द्यावरुन केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना आमच्यासोबत पाच वर्ष सत्तेत होती, तेव्हा कधी फडणवीसांकडे औरंगाबादचे संभाजीनगर करा, अशी मागणी केली होती का? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला केला आहे. त्यांच्या या प्रश्नालाशिवसेना पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उत्तर दिले आहे.

रावसाहेब दानवे यांनी व्यवस्थीत माहिती घ्यावी, फेकाफेकी करू नये, मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासंदर्भात चार पत्रे लिहली होती, असा दावा खैरे यांनी केला आहे. त्यामुळे आता खैरे यांच्या टीकेला भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Leave a comment

0.0/5