Skip to content Skip to footer

राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्टला राज्य सरकारची करमाफी?

राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्टला राज्य सरकारची करमाफी?

राज ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत १९९६ साली मायकल जॅक्सन यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात मायकल जॅक्सन याच्या कार्यक्रमावरील करमणूक कर माफ करण्याचा निर्णय कायम ठेवण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या (बुधवारी) बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

शिवसेना-भाजपच्या तत्कालीन सरकारने करमाफीचा निर्णय घेतला होता. तेव्हा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तत्कालीन सरकारच्या निर्णयावर ताशोरे ओढले होते. तसेच न्यायालयाने या आदेशाला स्थगिती देत हा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडे पाठवला होता. गेल्या २४ वर्षांपासून या मुद्द्यावरुन न्यायालयीन लढाई सुरु होती.

सरकारच्या मंत्रिमंडळाने आज करमाफीचा निर्णय घेतल्यास या निर्णयामुळे कॉन्सर्टची व्यवस्थापक असणाऱ्या कंपनीला तिकीट विक्रीतून मिळालेली ३.३६ कोटी रुपयांचे रक्कम परत मिळेल. ही रक्कम सध्या न्यायालयाच्या अखत्यारित असणाऱ्या ट्रेझरी विभागाकडे आहे.

Leave a comment

0.0/5