Skip to content Skip to footer

शिवसेना,काँग्रेस पक्षाला धोका देताना राणे तुम्हाला लाज कशी वाटली नाही?

शिवसेनेने फक्त पाच वर्ष भाजपा पक्षावर टीका केली, पाच वर्ष टीका आणि आता सत्तेसाठी युती केली. उद्धव ठाकरे यांना लाज कशी वाटत नाही अशा शब्दात राणे यांनी टीका केली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदार संघात स्वाभिमानी संघटने कडून उभे असलेले निलेश राणे यांच्या प्रचाराला ते बोलता होते. परंतु आज महाराष्ट्रातील जनतेला पडलेला प्रश्न आहे की, स्वतः भाजपा पक्षातून खासदार असलेले नारायण राणे यांनी घेतलेल्या भाजपाच्या विरोधातील भूमिकेमुळे ते स्वतः बंडखोर खासदार आहेत असेच आज म्हणावे लागेल. काँग्रेस पक्षात असताना भाजपा पक्षावर टीका करणारे आणि आज त्यांच्याच कोट्यातून खासदार म्हणून केंद्रात मिरवणाऱ्या नारायण राणे यांना आज लाज कशी वाटली नाही.

ज्या बाळासाहेबांनी आपल्याला राजकारणात आणले. आमदार बनवून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनविले आज त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसताना नारायण राणे आपल्याला लाज कशी वाटली नाही. ज्या पक्षाने तुम्हाला नावारूपाला आणले. ज्या पक्षाच्या जीवावर आज जुहू सारख्या मोठ्या बंगल्यात राहता त्या बाळासाहेबांना धोका देताना राणे तुम्हाला लाज कशी वाटली नाही. शिवसेना सोडून तुम्ही काँग्रेस पक्षात गेला तिथे महसूल मंत्री झाला. आपला मुलगा काँग्रेस खासदार आणि दुसरा मुलगा यायचं पक्षाचा आमदार झाला त्याच काँग्रेस पक्षाला धोका देताना तुम्हाला बरं लाज कशी वाटली नाही.

शेवटी तुम्ही लाचार होऊन भाजपा पक्षात गेला खासदार झाला. आज शिवसेना भाजपा युती नंतर सुद्धा भाजपा विरोधात भूमिका मांडताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. जो स्वतः पत्र्याच्या घरात राहतो त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारायचे नसतात हेच आज आपण विसरलेले दिसत आहे. भाजपा खासदार म्हणून मिरवायचे आणि त्याच्याच विरोधात भूमिका मांडायच्या अश्या दुतोंडी भूमिका मांडणे आपल्या सारख्या वजनदार आणि अनुभवी नेत्यांना न जमणारे आहे. म्हणूनच आज आपण आपल्या मुलाला खासदार म्हणून उभे करून आपले आणि आपल्या मुलाचे राजकारण संवण्याचा मार्गावरच असताना दिसत आहे.

Leave a comment

0.0/5