Skip to content Skip to footer

वर्षा संजय राऊत यांना ईडीकडून आणखी एक समन्स, होणार पुन्हा चौकशी

वर्षा संजय राऊत यांना ईडीकडून आणखी एक समन्स, होणार पुन्हा चौकशी

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीची नोटीस धाडली होती. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते.

तसेच झालेल्या सूडबुद्धीच्या कारवाई विरोधात खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. आता पुन्हा एकदा चौकशीसाठी वर्षा संजय राऊत यांना ईडीने नोटीस धाडली आहे. त्यानुसार वर्षा राऊत यांना ११ जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

५५ लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे, ज्यात वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले होते. ईडीने त्यांना नोटीस पाठवून २९ डिसेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्याने निर्देश दिले होते. यानंतर थोडीशी मुदत वाढवून घेत ४ जानेवारी रोजी वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती.

Leave a comment

0.0/5