Skip to content Skip to footer

भिडे मास्तरांच्या लेकीचा बिकीनी अवतार व्हायरल

निधीने समुद्रात केलं पाळीव श्वानासोबत स्विमिंग

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे अनेकदा चाहत्यांमध्ये जेठालाल, दयाभाभी, माधवी भाभी, टप्पू किंवा सोनू या कलाकारांची चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भिडे मास्तरांची लेक सोनू म्हणजेच निधी भानुशाली चर्चेत येत आहे. सध्या निधी तिची सुट्टी एन्जॉय करत असून अलिकडेच तिने स्विमिंग करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

निधी भानुशाली अनेकदा तिच्या बिकीनी फोटोमुळे चर्चेत येत असते. अनेकदा तिला या फोटोंमुळे ट्रोलदेखील व्हावं लागतं. मात्र, निधी बेधडकपणे या ट्रोलर्सला उत्तर देत असते. विशेष म्हणजे ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत निधीने तिचे व्हेकेशनमधील काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती बिकीनीमध्ये दिसत असून समुद्रात पोहताना दिसत आहे. केवळ निधीच नाही तर यावेळी तिचे काही मित्र-मैत्रिणी आणि पाळीव श्वानदेखील समुद्रात पोहताना दिसून येत आहे.

दरम्यान, निधीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात असून १ लाखांपेक्षा अधिक लाइक्स या फोटोला मिळाले आहेत. तर कमेंट्सचा त्यावर पाऊस पडत आहे. निधी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने तारक मेहता का उलटा चष्मामध्ये सोनू ही भूमिका साकारली होती. जवळपास ६ वर्ष तिने या मालिकेत काम केलं होतं.

Leave a comment

0.0/5