Skip to content Skip to footer

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता ‘या’ पदाचा कार्यभार सांभाळणार

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता ‘या’ पदाचा कार्यभार सांभाळणार

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे आणि बदली हे समीकरण अख्या महाराष्ट्राला माहिती झाले आहे. तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कडक स्वभावामुळे व नियमांच्या चोख पालनामुळे अनेकदा राजकीय नेत्यांचे व त्यांचे खटके देखील उडालेले पाहायला मिळाले होते. याच त्यांच्या कडक स्वभावामुळे नवी मुंबई आणि नागपूर महानगर पालिकेतील आयुक्त पद वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

आता त्यांची राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढे यांच्यासह आज चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. उदय जाधव यांची राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर एमपीसीएलचे अतिरिक्त मुख्यसचिव अरविंद कुमार यांची मंत्रालयात मार्केटिंग आणि टेक्स्टाईल विभागात बदली करण्यात आली आहे. डी. बी. गायकवाड यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे ज्वॉईंट सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली गेली आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढेंची नागपुरातून बदली करण्यात आल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर उतरले होते. त्यांनी ‘आय सपोर्ट तुकाराम मुंढे’ असे फलक देऊन मुंढेंना निरोप दिला होता. यानंतर. मुंढेंनी देखील भावुक होऊन शोषलं माध्यमांद्वारे आपली प्रतिक्रिया दिली होती.

Leave a comment

0.0/5