Skip to content Skip to footer

गाव करील ते राव काय करील, आमदार अबिटकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला

गाव करील ते राव काय करील, आमदार अबिटकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला

राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या सर्व निकालात शिवसेना पक्षाने बाजी मारली आहे. अदयाप संपूर्ण चित्र समोर येण्यासाठी दुपार उजडेल असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आज जाहीर झालेल्या निकालात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भाजपाचा जोरदार पराभव केला आहे. खानापूरात शिवसेनेला नऊ पैकी सहा जागा मिळाल्या आहेत. तर उर्वरित ३ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, खानापूरचा निकाल चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खूप मोठा धक्का मनाला जात आहे.

या विजयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, गाव करील ते राव काय करील, अशा शब्दात आबिटकर यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, खानापूरची जनता सुज्ञ आहे. विकासाच्या कामावर हा विजय झाला आहे. त्यामुळे मी खानापूरच्या जनतेचे आभार मानतो.

Leave a comment

0.0/5