Skip to content Skip to footer

पाकिस्तानातील सिंध प्रांतात झळकले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर

पाकिस्तानातील सिंध प्रांतात झळकले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर

पाकिस्तानात वेगळया सिंध राष्ट्राची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी सिंध प्रांतातही सान भागात मोठा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो स्थानिक सहभागी झाले होते. या मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील प्रमुख देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे फलक स्थानिकांनी हाती घेतले होते. पाकिस्तानापासून वेगळे होऊन सिंधूराष्ट्र स्थापन करावे, या प्रमुख मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता.

सान शहरात रविवारी प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला. आंतरराष्ट्रीय समुदयाने आमच्या स्वातंत्र्य लढ्यात हस्तक्षेप करावा आणि वेगळा सिंधू देश करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोर्चेकरांनी स्वतंत्र सिंधू राष्ट्राच्या घोषणाही दिल्या. जीएम सैयद यांच्या ११७ व्या जयंतीच्या निमित्ताने हा प्रचंड मोर्चा पाकिस्तानात काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

जीएम सैयद यांना आधुनिक सिंधी राष्ट्रवादाचे संस्थापक मानले जाते. सिंध, सिंधू खोरे सभ्यता आणि वैदिक धर्माचे पवित्र स्थान आहे. ब्रिटिशांनी या भागावर अवैधरितीने कब्जा केला आणि १९४७ रोजी पाकिस्तानात हा भाग समाविष्ट केला, असा दावा यावेळी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आला. सिंध प्रांतात अनेक राष्ट्रवादी पक्ष आहे. या भागात वारंवार वेगळ्या सिंधू राष्ट्राची मागणी केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे सिंधू राष्ट्र व्हावे, यासाठी मोर्चे, आंदोलने केली जात आहेत.

Leave a comment

0.0/5