Skip to content Skip to footer

शिवसेनेचे हिंदुत्व प्रबोधनकारी विचारांचे आहे – डॉ नीलम गोऱ्हे

शिवसेनेचे हिंदुत्व प्रबोधनकारी विचारांचे आहे – डॉ नीलम गोऱ्हे

शिवसेनेचे हिंदुत्व प्रबोधनकारी विचारांचे आहे. येथे जीवन व्यवस्थेला स्थान नाही. परंतु अंधश्रद्धा, रुढी आणि परंपरा आज डिजिटल माध्यमातून पुन्हा समाजासमोर येत आहेत. अशावेळी प्रबोधनकारांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यासाठी अधिकाधिक नवीन माध्यमांचा वापर करणे गरजेचे आहे. असे डॉ नीलम गोऱ्हे यांनी बोलून दाखविले. गुरुवारी त्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शताब्दीनिमित्त ‘संवाद पुणे’तर्फे आयोजित ‘प्रबोधन महोत्सवा’च्याउद्‌घाटन प्रसंगी बोलत होत्या.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, शिवसेना उपनेते, प्रबोधन युवा मंचचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, सुनील महाजन, शिवसेनेचे उपशहरप्रमुख किरण साळी, निकिता मोघे, सचिन इटकर उपस्थित होते.

तर जिथे अन्याय, तिथे शिवसेना’ कायम लोकांसोबत आहे. प्रबोधनकार ठाकरे यांची लेखणी कोणत्याही लोभाला बळी पडली नाही. त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून आपल्याला नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास प्रबोधनकार ठाकरे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांनी व्यक्‍त केली.

Leave a comment

0.0/5