Skip to content Skip to footer

फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या आले अंगलट, भाजपच्या दोन गटात जोरदार हाणामारी

फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या आले अंगलट, भाजपच्या दोन गटात जोरदार हाणामारी

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्यात तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात संघर्ष वाढताना दिसत आहे. त्यात गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या दोन कार्यालयांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी हाणामारी आणि जाळपोळही पाहायला मिळाली. मात्र हा राडा दोन वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही, तर भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये झाला.

‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपच्या नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी आणि जाळपोळ करण्यात आली. पहिली घटना आसनसोल येथील भाजप कार्यालयात तर दुसरी घटना बर्दवान येथे झाली. आसनसोल येथे झालेल्या राड्यावेळी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि राष्ट्रीय सचिव अरविंद मेनने हे देखील उपस्थित होते.

बर्दवान येथील झालेली घटना जिल्हाध्यक्ष संदीप नंदी यांना पदावरून हटवण्याच्या मागणीमुळे झाली. विशेष म्हणजे हा सर्व वाद भररस्त्यात झाला आणि भाजपाच्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. यावेळी टेम्पो आणि दुचाकी पेटवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्याशीही अरेरावीची भाषा केली. या घटनेत ४ जखमी झाले असून ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a comment

0.0/5