आमदार ‘डॉ. राहुल आहेर’ यांच्या प्रयत्नांतून विविध विकासकामे मार्गी लागले…
महाराष्ट्र बुलेटिन : चांदवड व देवळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रयत्नांतून मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लागले आहेत.
नुकतेच त्यांनी चांदवड तालुक्याच्या सुतारखेडे या गावात अनेक कामांचे भूमिपूजन देखील केले. येथे त्यांच्या प्रयत्नांतून जिल्हा क्रीडा योजनेअंतर्गत व्यायाम शाळा इमारत बांधण्यासाठी ७ लक्ष रुपये, डी.पी.डी.सी. योजनेअंतर्गत स्मशानभूमीस संरक्षण भिंत बांधण्यासाठी ५ लक्ष रुपये, नवबौद्ध घटकांचा विकास योजने अंतर्गत आंबेडकर नगर येथे हायमास्ट बसविण्यासाठी ५ लक्ष रुपये तसेच नवबौद्ध घटकांचा विकास योजने अंतर्गत आंबेडकर चौक येथे रस्ता काँक्रीटिकरण करण्यासाठी ५ लक्ष रुपये मंजूर झाले असून या कामांचे भूमिपूजन त्यांनी काल खा.डॉ. भारतीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत केले.
त्यासोबतच चांदवड तालुक्याच्या जोपुळ येथे त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून सभामंडप मंजूर करून दिला आहे. तसेच मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात चांदवड तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. यामुळे अनेक गावांना फटका बसला होता.
या वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे, पॉलिहाऊसचे व शेतीमालाचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी आमदार साहेबांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली होती आणि नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले होते.
नागरिकांच्या कुठल्याही समस्या असो त्यांच्याप्रती ठाम निर्णय घेऊन समस्यांची सोडवणूक करण्यास ते नेहमी तत्पर असतात. यामुळेच अगदी तळागाळातल्या लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले आहेत. जनतेच्या हितावह निर्णय घेत असल्यामुळे आणि जनतेशी जवळीक साधल्यामुळे एक लोकप्रिय आमदार म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिले जाते.