Skip to content Skip to footer

कांदिवली पूर्वेकडील ठाकूर विलेज येथे सिद्धेशजी कदम यांनी केले लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

कांदिवली पूर्वेकडील ठाकूर विलेज येथे सिद्धेशजी कदम यांनी केले लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

महाराष्ट्र बुलेटिन : आज कांदिवली पूर्वेकडील ठाकूर विलेज येथे नगरसेवक माधुरी भोईर, माजी नगरसेवक योगेश भोईर आणि सोसायटीच्या व्यवस्थापकीय कमिटीसमवेत चॅलेंजर्स सोसायटीमध्ये लसीकरण मोहिमेचे उद्घाटन सिद्धेशजी कदम यांच्या हस्ते पार पडले.

विशेष म्हणजे येथील सोसायटींनी सामुदायिक कंपोस्ट खत बनवण्यासाठी पुढाकार घेतला असून सुमारे ३००० घरांमधील १००% ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करून ते अंगणात लावलेल्या झाडांसाठी, रोपांसाठी या खताचा वापर करतात.

घरातील ओला कचरा व सुका कचरा यांचे वर्गीकरण करून चांगल्या कामासाठी याचा वापर केला जातो हे खरंच वाखाणण्याजोगे असून या अतिशय स्तुत्य अशा उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

तसेच नुकतेच त्यांच्या विशेष प्रयत्नांनी व युवासैनिकांच्या साहाय्याने युवासेना प्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विभाग क्र. १ व २ मध्ये “विशेष लसीकरण मोहीम” आयोजित करण्यात आली होती.

या लसीकरण मोहिमेत अनेक रहिवाशांनी आपले लसीकरण करून घेतले आणि सिद्धेश कदम यांनी देखील लसीकरणाचा प्रथम डोस घेतला. यासोबतच सर्व नागरिकांनी आपापले लसीकरण करून घ्यावे आणि शासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Leave a comment

0.0/5