Skip to content Skip to footer

ड्यू प्लेसीनं घेतलं रबाडाचं चुंबन, प्रेयसी झाली नाराज

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील फॅफ ड्यू प्लेसी आणि रबाडा यांचा फोटो चांगलाच गाजतोय. आफ्रिकेच्या कॅगिसो रबाडाने पंड्याला बाद करुन आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. पंड्यांच्या विकेटचा जल्लोष साजरा करण्यासाठी ड्यू प्लेसीनं धावत जाऊन रबाडाच्या कपाळाचं चुंबन घेतलं. हा फोटो खुद्द कर्णधार फॅफ ड्यू प्लेसीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

News

“जेव्हा तुम्ही नंबर वन गोलंदाज बनता, तेव्हा तुमच्यावर असंच प्रेम केलं जातं. वेल डन रबाडा”, असं लिहित ड्यू प्लेसीनं रबाडाचं कौतुक केलं. या फोटोवर अनेकांनी भरभरून कॉमेंट्स केल्या. त्यात रबाडाही होता. चुंबन घेतल्यामुळे माझी प्रेयसी मात्र नाराज झाली असल्याचं रबाडानं कॉमेंट करून म्हटलं. अर्थात त्यानं हे गंमतीनं म्हटलं पण त्याची कॉमेंट आणि हा फोटो मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पहिल्या कसोटीत आफ्रिकेने भारतावर ७२ धावांनी विजय मिळवला. अष्टपैलू हार्दिक पंड्याने ९३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळेच भारतीय संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला. भारताच्या ७ विकेट्स झटपट गेल्या असताना, आठव्या विकेटसाठी आफ्रिकन गोलंदाजांना मोठा संघर्ष करावा लागत होता. त्यावेळी आफ्रिकेच्या कॅगिसो रबाडाने पंड्याला बाद करुन, आपल्या संघाला दिलासा दिला होता.

https://www.instagram.com/p/BdxYUHsg9Qb/

For More

Leave a comment

0.0/5