Skip to content Skip to footer

मी स्वत:ला कोहलीमध्ये पाहतो, सांगतायत ‘हे’ महान फलंदाज

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 :विराट कोहली हा आक्रमक कर्णधार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे बऱ्याचदा कोहली टीकेचा धनीही ठरतो. पण बऱ्याच जणांना कोहलीचा आक्रमकपणा नेहमीच आवडतो. आता तर एका माजी महान फलंदाजांनी स्वत:ची तुलना कोहलीबरोबर केल्याचे पाहायला मिळाले आहे.सर व्हिवियन रीचर्ड्स यांनी मात्र कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. मी स्वत:ला कोहलीमध्ये पाहतो, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सर रीचर्ड्स यांचा एकेकाळी चांगलाच दरारा होता. वेस्ट इंडिजची गोलंदाजी म्हणजे तोफखाना समजली जायची. त्याचवेळी रीचर्ड्स हे फलंदाजीसाठी जगप्रसिद्ध होते. त्यांचा एकेकाळी दरारा एवढा होता की, ते फलंदाजीला आल्यावर गोलंदाजांना घाम फुटायचा. आता तर त्यांनी आपली तुलना कोहलीबरोबर केल्याने पुन्हा एकदा रीचर्ड्स चर्चेत आले आहेत.

रीचर्ड्स म्हणाले की, ” मला आक्रमक खेळाडू आवडतात. विराटमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की, ज्या पाहिल्यावर मला माझ्या फलंदाजीची आठवण येते. मी जेव्हा खेळत होतो तेव्हा माझ्याकडे ज्या गोष्टी होत्या, त्या कोहलीकडे आहेत. विराटने जे काही कमावले आहे ते एका रात्रीमध्ये तयार होत नाही. त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. कोहली हा एक लढवय्या आहे. त्यामुळे तो प्रतिस्पर्ध्यांपासून नेहमीच भारतीय संघाचे रक्षण करत आला आहे.”रिचर्ड्स पुढे म्हणाले की, ” भारतीय फलंदाजांचा मी पूर्वीपासूनच चाहता आहे. सुनील गावस्कर हे भारताचे गॉडफादर आहे, असे मला नेहमी वाटत आले आहे. त्यांच्याबरोबर मला खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकरसारखा महान फलंदाज भारताला लाभला. सचिननंतर आता विराट भारतीय संघाचा तारा आहे.”

वर्ल्डकपपूर्वीच कोहली झाला ‘या’ गोलंदाजाचा फॅन
भारतीय संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघ कसून सरावही करत आहे. पण सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा एका गोलंदाजाचा चक्क फॅन झाला आहे. हा गोलंदाज भारतीय संघातील नसला तरी कोहलीला त्या गोलंदाजाने भूरळ पाडली आहे.इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर भारतीय संघाने नेट्समध्ये चांगला सराव केला. वर्ल्डकपला 30 जूनपासून सुरुवात होणार आहे.
पण वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच कोहलीने एका गोलंदाजावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. हा गोलंदाज नेमका कोण, याबद्दल साऱ्यांनाच उत्सुकता आहे.वर्ल्डकपपूर्वी आयपीएल खेळवण्यात आली. आयपीएलमध्ये या गोलंदाजाने आपली चमक दाखवली होती. त्याबरोबर आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळतानाही या गोलंदाजाने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे क्रिकेट जगतामध्ये या गोलंदाजाचा चांगलाच दबदबा आहे. हा गोलंदाज आहे अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खान.

Leave a comment

0.0/5