Skip to content Skip to footer

IND vs ENG : स्टोक्सनं पकडलेल्या ‘झेल’ वर प्रश्नचिन्ह, टीव्ही अंपायरचा निर्णय पुन्हा वादात

महाराष्ट्र बुलेटिन : भारत आणि इंग्लंड यांच्यात मोटेरा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीव्ही अंपायरचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात आहे. याआधी देखील चेन्नईत खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात टीव्ही अंपायरचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. भारतीय डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये फिल्ड अंपायर अनिल चौधरीने शुभमन गिलला सॉफ्ट सिग्नलअंतर्गत बाद म्हणून घोषित केले, परंतु टीव्ही अंपायरने रिप्ले पाहून फिल्ड अंपायरच्या निर्णयाला बदलले. तथापि टीव्ही अंपायर सी शमसुद्दीनने एक बाजूच्याच फ्रेमला पाहून आपला निर्णय दिला. परंतु सॉफ्ट सिग्नलच्या नियमानुसार फिल्ड अंपायरच्या नियमाला बदलण्यासाठी ठोस पुरावा असणे गरजेचे असते. या निर्णयानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटसह सर्व खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.

भारतीय डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये ब्रॉडच्या चौथ्या चेंडूवर गिलचा झेल स्लिप मध्ये फिल्डिंग करत असणाऱ्या स्टोक्सने पकडला. अंपायरने त्यास आउट घोषित केले. मात्र त्यांना खात्री नव्हती की स्टोक्सने बॉल योग्य प्रकारे पकडला की नाही त्यामुळे त्यांनी अंतिम निर्णयासाठी टीव्ही अंपायरचा सहारा घेतला. टीव्ही रीप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की जेव्हा स्टोक्सने बॉल पकडला तेव्हा त्याचे हात बॉलखाली नव्हते. परंतु नियमानुसार टीव्ही अंपायरने यास वेगवेगळ्या अँगलने पाहायला हवे होते.

सामन्यादरम्यान कॉमेंट्री करत असणाऱ्या माजी भारतीय कप्तान सुनील गावस्कर यांनी सांगितले की स्टोक्सने झेल व्यवस्थितपणे पकडला आहे की नाही याचे त्यांच्याकडे ठोस पुरावे नाहीत. जर कुणाला आक्षेप घ्यायचा असेल तर ते मला नंतर भेटू शकतात. तथापि, माजी भारतीय खेळाडू संजय मांजरेकर यांनी टीव्ही अंपायरच्या ताबडतोब घेतलेल्या निर्णयावर प्रशचिन्ह उपस्थित केले.

 

Leave a comment

0.0/5