Skip to content Skip to footer

पंतप्रधान नरेंद्र मोदी मला सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे नेते वाटू लागलेत – संजय राऊत

अहमदाबादमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. या निर्णयावरून काँग्रेस बरोबर सर्व विरोधकांनी भारतीय जनता पक्षावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यापाठोपाठ आता शिवसेना नेते आणि संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

राऊत यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, गुजरात राज्य सरकारला जे योग्य त्यांनी ते केले आहे. मला तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदीसरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल हे आमचे आदर्श आहेत. अलिकडच्या काळात भाजपाचे त्यांच्यावरील प्रेम वाढलं आहे. गुजरातमधील स्टेडियमला काय नाव द्यावे हा त्यांचा सरकारचा निर्णय आहे. तुम्ही आणि आम्ही यामध्ये काय बोलू शकतो. स्टेडियमच्या नावाबाबतचा निर्णय क्रिकेट बोर्डाचाही असू शकतो. एखादा राजकीय पक्षाने काय करायला हवं आणि काय नाही हे आम्ही ठरवू शकत नाही. त्यांना योग्य वाटलं असेल ते त्यांनी केले आहे असे राऊत यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5