आगामी लोकसभा निवडणुकीला फेसबुकने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिलेला आहे. निवडणुकीमध्ये कोट्यवधी लोक वापरत असलेल्या फेसबुकच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी विविध पक्षांनी तयारी केली आहे. यासाठी विविध पेजेस सुरू करण्यात आली. परंतु सोमवारी फेसबुकने काँग्रेसशी संबंधीत असलेली ६८७ पेजेस हटवली आहेत. या पेजेसच्या माध्यमातून आचारसंहिते दरम्यान खोटी माहिती आणि बातम्या पसरवण्यात आल्याने फेसबुकने ही कारवाई केली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशामध्ये फेसबुकने पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे एन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे.
या कारवाईबाबत फेसबुकने सांगितले की, पेजेससंबंधी तक्रारीनंतर याची चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये युझर्स बनावट अकाऊंटच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसिद्ध करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच बनावट अकाऊंटद्वारे युझर्स एंगेजमेंट वाढवण्यासाठी विविध ग्रुपमध्ये सहभागी होत होते. हे युझर्स स्थानिक बातम्या आणि पंतप्रधान मोदी व भारतीय जनता पक्ष यासारख्या राजकीय पक्षांविरोधात खोट्या व चुकीच्या पोस्ट टाकताना आढळून आल्याने तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे फेसबुकने म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे काँग्रेस पक्षाचा खोटारडेपणा समोर आलेला आहे.
फेसबुकच्या सायबरस्पेस पॉलिसीचे प्रमुख नथानिएल ग्लीइकर यांनी आजच्या कारवाईबाबत सांगितले की, ‘संबंधीत युझर्सने खोटी अकाऊंट तयार करून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला आहे. तपासणीमध्ये आम्हाला असे दिसून आले की काही व्यक्ती काँग्रेसच्या आयटी सेलसंबंधीत आहेत आणि खोटी माहिती प्रसिद्ध करून फेसबुकचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. तसेच फेसबुकने ही कारवाई युझर्सने कशा पद्धतीने पेज व अकाऊंट हाताळले याच्या आधारे केली आहे. ही कारवाई त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या कंटेंटच्या आधारे करण्यात आली नसल्याचेही ग्लीइकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा मोठा धक्का बसलेला आहे.