Skip to content Skip to footer

पार्थ पवार पुन्हा ट्रोल, पादरी सोबतच्या फोटामुळे पुन्हा चर्चेत

पार्थ अजित पवार यांना मावळ मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपल्या वर्तणुकीमुळे आपल्या अडचणीत वाढ करून घेताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी त्यांचे पहिले भाषण खुपच गाजले असताना, आपल्या मतदार संघात खाली रस्त्यावरून पळणे, सीएसटी ते पनवेल उलटा प्रवास करणे त्यामुळे ते अनेकवेळा नेटकर्त्यांच्या रडारवर आले होते. आता चर्चच्या पादरी बरोबर वायरल होणाऱ्या फोटोमुळे पुन्हा नेटकर्त्यांच्या रडारवर आलेले आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये दौऱ्यावर असताना पार्थ पवार यांनी विनियार्ड वर्कर्स चर्चला भेट दिली. यावेळी तिथले फादर पीटर सिल्व्हा उर्फ पास्टर सिल्वे या पादरींचीही त्यांनी भेट घेतली. त्यांनी पार्थ यांच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांना आशीर्वाद दिली. डोळे बंद करून मंत्रोच्चार देखील केला.

या चर्चचे पादरी म्हणजेच पास्टर सिल्वे हे स्वत:ला खुद्द येशूचे दूत म्हणवतात. साधना केल्यानंतर त्यांना प्रचंड शक्ती प्राप्त झाली असून कितीही आजारी असलेला रुग्ण असला, तरी त्यांच्या फक्त डोक्यावर हात ठेवल्यामुळे, रुग्णाकडे पाहिल्यामुळे, रुग्णाजवळ उभं राहिल्यामुळे किंवा फक्त स्टेजवर गेल्यामुळे हा रुग्ण अगदी ठणठणीत बरा होतो असा यांचा दावा आहे. विशेष म्हणजे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. अशा पद्धतीने कोणत्याही तार्किक पातळीवर सिद्ध होऊ न शकणारे उपचार करणाऱ्या ख्रिस्ती पादरीची पार्थ पवारांनी भेट घेतल्यामुळे खरा वाद सुरू झाला. एकीकडे त्यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कायम पुरोगामित्वाची कास धरली. सुप्रिया सुळे यांनी तर काही प्रसंगी सत्यनारायणाच्या पूजेला देखील विरोध केला आहे. पण त्याचवेळी पार्थ पवार मात्र अशा प्रकारे अंधभक्ती पसरवणाऱ्या व्यक्तीची भेट घेतात, हे नेटिझन्सला पटलेलं नाही.

वास्तविक पाहता हा चर्च असलेला दापोडी, कासारवाडी, खडकीचा काही भाग हा ख्रिश्चनबहुल आहे. या भागात ख्रिश्चन मतांचं जास्त प्रमाण आहे. त्यामुळे या मतांसाठीच पार्थ पवार यांनी या पादरी महाशयांना भेट दिली अशी टीका देखील होऊ लागली आहे. आणि सध्या निवडणुकांचा हंगाम असल्यामुळे त्यात तथ्य देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त मतांच्या राजकारणासाठी आपल्या धर्मा विरुद्ध गोष्ट करणे हे शरद पवार यांच्या सारख्य पुरोगामी विचाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या नातवाला न पटणारे आहे असेच बोलेल जात आहे.

Leave a comment

0.0/5