Skip to content Skip to footer

आर्थिक संकटात अडकलेल्या लालपरीला शासनाकडून २०० कोटीची मदत

आर्थिक संकटात अडकलेल्या लालपरीला शासनाकडून २०० कोटीची मदत

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली एसटी अर्थात लाल परी सध्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे एसटीला शासनाकडे असलेले देणं मिळावे, जेणेकरून एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन होण्यास अडचणी उद्भवणार नाही, एसटीच्या किमान प्राथमिक गरजा पूर्ण होण्यास काही अंशी तरी दिलासा मिळू शकतो, यासंदर्भात प्रसार माध्यमांनी वेळोवेळी बातमीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे. या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने ३ जानेवारी २०२० या दिवशी परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकात एसटी महामंडळाला विविध प्रवास सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी द्यावयाच्या २९२ कोटी ८९ लाख इतक्या रकमेपैकी दोनशे कोटी इतक्या रकमेचा निधी रोखीने प्रदान करण्यास मान्यता देत असल्याचं नमूद करण्यात आले आहे. सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षाच्या तरतुदींमधून हा निधी दिला जाणार आहे. या परिपत्रकात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, सदर खर्च २०१९-२०२० या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा

भाजपाशी युती करणे सावंतांना भोवणार, लवकरच होणार पक्षातून हक्कलपट्टी

शासनाने एसटीला दिलेल्या या दोनशे कोटी रुपयांच्या निधीमुळे दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. शासनाने उर्वरित ९२ कोटी ७९ रुपयांचा निधीदेखील एसटी महामंडळाला लवकरात लवकर कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावे. तसेच एसटीला इंधन अधिभार, टोल टॅक्स यातूनदेखील मुक्त करावे, अशी मागणी एसटीच्या गोटातून केली जात आहे.

Leave a comment

0.0/5