Skip to content Skip to footer

तानाजी सावंत यांच्या जागी सेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी यांना संधी

तानाजी सावंत यांच्या जागी सेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी यांना संधी

विधानपरिषदेचे दोन सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने या दोन जागांसाठी आता निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसेच शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत या दोघांची विधानपरिषदेतील जागा रिक्त झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या जागी बीडमधील राष्ट्रवादीचे नेते संजय दौंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर यवतमाळ मतदार संघातून महाविकास आघाडीने शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे.

यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत विधानपरिषदचे सदस्य होते. आता ते धाराशिव मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. आता त्यांच्या जागी दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

“महाविकास आघाडीकडून आज दुष्यंत चतुर्वेदी उमेदवारी अर्ज भरत आहेत. शिवसेनाच्या उमेदवरासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही अर्ज भरण्यास उपस्थित राहणार आहेत. यवतमाळ विधानपरिषद निवडणूक आम्ही जिंकू. महाविकास आघाडीच्या कुठल्याही स्थानिक नेत्यांची नाराजी नाही.

महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत”, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मराठी माध्यमांना दिलेली आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यापूर्वी माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर सुद्धा उपस्थित होते.

‘आज के शिवाजी’ पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना – सामना

Leave a comment

0.0/5