Skip to content Skip to footer

मी कधी स्वतःला जनता राजा म्हणून म्हंटले नाही – शरद पवार

मी कधी स्वतःला जनता राजा म्हणून म्हंटले नाही – शरद पवार

सध्या राज्यात “आजके शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकावरून भजपा विरोधात संतापाची लाट पसरलेली आहे. त्यातच खासदार संजय राऊत यांनी साताऱ्याचे राजे व माजी खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे राजे तथा खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन खडेबोल सुनावले आहे. यावरून खासदार राऊत आणि साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांच्या वाद सुरु झालेला आहे. पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत छत्रपती उदयराजेंनी “जनता राजा” वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे अद्यक्ष शरद पवार यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे.

यावर आपले मत मांडताना शरद पवारांनी उदयनराजेंना टोला लगावला आहे. जाणता राजा हा शब्द प्रयोग रामदासांनी वापरला. पण रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, तर जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बोलून दाखविले. इतकच नाही तर मी कुठेही मला जाणता राजा म्हणा असे बोललेलो नाही, असे सांगतानाच शरद पवार यांनी भाजप नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांना खडेबोल सुनावले

Leave a comment

0.0/5