Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे यांच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारी झाले चकित

आदित्य ठाकरे यांच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारी झाले चकित

आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमदार झाले, एक-दोन महिन्यात त्यांनी पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री पदाची शपथ सुद्धा घेतली. त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच आमदार झाले, एक-दोन महिन्यात त्यांनी पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री पदाची शपथ सुद्धा घेतली. त्यामुळे त्यांना सरकारी कामकाजाचे कितपत न्यान असेल या विषयी अनेकांकडून शंका उपस्थित केली जात होती. परंतु आदित्य ठाकरे प्रचंड अभ्यासू आहेत आणि उत्तम मार्गदर्शन सुद्धा करू शकतात याची झलक शनिवारी सह्याद्री अतिथिगृहावर पार पडलेल्या बैठकीत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना आलेली आहे. त्यांच्या या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस सुद्धा चकित झाले होते.

मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण खाते आहे आणि या खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली होती. या बैठकीला पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष श्रीवास्तव व सदस्य सचिव रवींद्रन हे तीन आयएएस अधिकारी उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी या अधिकारी वर्गाकडून विविध पर्यावरण विषय समजून घेतले तसेच अधिकाऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन सुद्धा केले.

वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचा आदित्य ठाकरेंच्या ‘नाईट लाईफच्या संकल्पनेचा पाठिंबा

Leave a comment

0.0/5